वेंगुर्ले / प्रतिनिधी-
वेंगुर्ले तालुक्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींनी ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. अशी माहीती गट विकास अधिकारी उमा पाटील यांनी दिली. अणसूर, आसोली, आरवली, आडेली, उभादांडा, कुशेवाडा, केळुस, कोचरा, खानोली, वायंगणी, चीपी, परुळेबाजार, भोगवे, मठ, मातोंड, मोचेमाड, म्हापण, रेडी, वजराट, वेतोरे, शिरोडा, होडावडा, मेढा, पालकरवाडी या २४ ग्रा. पं. नी ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत.