फॅमिली ग्रूपवरील संदेशांना प्रतिसाद देण्याची जबाबदारी
सोशल मीडियाच्या या युगात व्हॉट्सऍपचा वापर न करणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. लोकांनी स्वतःचे कुटुंब आणि नातलगांची विचारपूस करण्यासाठी फॅमिली ग्रूप तयार केले असून त्यावर गंभीर गोष्टींसह चेष्टामस्करी देखील होते. पण एका व्यक्तीने व्हॉट्सऍप फॅमिली ग्रूपमध्ये स्वतःच्या वतीने प्रतिसाद देण्यासाठी एक सेक्रेटरीच नियुक्त केली आहे.
सेक्रेटरीकडून त्या कौटुंबिक ग्रूपमध्ये होणाऱया प्रत्येक संभाषणाला प्रतिसाद दिला जातो, व्हॉट्सऍपसाठी सेक्रेटरी नियुक्त करणाऱया व्यक्तीचे नाव जैन याकूब आहे. या व्यक्तीने कुटुंबाच्या व्हॉट्सऍपमध्ये त्याच्या वतीने सर्व संदेशांना प्रतिसाद देण्यासाठी इयानला स्वतःचा सचिव म्हणून नियुक्त केले आहे.
पण लवकरच याकूबच्या कुटुंबाला यासंबंधी समजले आणि त्यांनी त्याच्यासोबत थट्टा करण्याचा निर्णय घेतला. जैनच्या वडिलांनी स्वतःच्या मुलाला आपले प्रेम पाठविण्यास सांगिल्यावर इयान अवाप् झाला.
जैनचा भाऊ जॅचने एक व्हायरल टिकटॉक व्हिडिओ शेअर केला असून यात इयानच्या माध्यमातून प्राप्त मेसेजची एक पूर्ण सीरिज दिसून येते. टिकटॉकवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोक यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
व्हॉट्सऍप ग्रूप कुटुंब आणि स्वतःच्या प्रियजनांशी संपर्क कायम ठेवण्याच्या या युगात अत्यंत उपयुक्त ठरत आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होण्यासोबत लोक सण किंवा आनंदाच्या क्षणी शुभेच्छांचा संदेश पाठविण्यासाठी मेसेजिंग ऍप्लिकेशनची मदत घेत आहेत. विवाहाच्या निमंत्रणपत्रिका आताही व्हॉट्सऍपवरूनच प्रसारित केल्या जात आहेत.