प्रतिनिधी/सातारा
सातारा शहरात गेल्या तीन वर्षात बांधकाम व्यवसाय पूर्णपुणे कोलमडला आहे. आधी नोटबंदी, नंतर रेरा आणि गतवर्षी आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सकंटाची मालिकाच सुरु होती. आता 2021 च्या वर्षात सरकारने थोडेसे बदल केले आहेत. त्यामुळे शहरातील बांधकाम व्यवसायिक पुन्हा नव्याने गरुड भरारी घेण्याच्या तयारीत आहेत. अनेक ठिकाणी छोटीमोठी कामे सुरु आहेत, अशी माहिती बांधकाम व्यवसायिक सयाजी चव्हाण यांनी दिली.
सातारा शहर हे बांधकाम व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याकरिता चांगले शहर म्हणून ओळखले जाते. बांधकाम व्यवसाय हा गुंतवणूक करण्याकरिता एक चांगला व्यवसाय समजला जातो. शेअर मार्केट, गोल्ड आणि रिअलइस्टेट यामध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र नोटबंदीपासून कन्स्ट्रक्शन लाईनकडे तशी मंदीच होती. सातारा शहरातल्या बांधकाम व्यवसायिकांनी एवढय़ा मोठय़ा साईट सुरु केल्या नाहीत. एकदोन बांधकाम व्यवसायिक वगळता सर्वांच्याच पाच ते दहा प्लॅटच्या स्कीम सुरु असतात. रेरामुळे नवीन बांधकाम व्यवसायिक तयार होवू शकला नाही. जुने आहेत त्यांना रेरा कायद्याने त्रुटी निर्माण केल्या आहेत. जानेवारी ते मार्चपर्यंत थोडासा वेग घेतला होता. परंतु पुन्हा कोरोनामुळे परिस्थिती बिघडली. कामगार आपल्या गावी गेले. कच्चा मालांची दुकाने बंद होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे काम ठप्प झाले. गेल्या चार महिन्यात पुन्हा हळूहळू काम सावरत असले तरीही एवढा वेग नव्हता. आता मात्र जानेवारी पासून नव्याने बांधकामांना वेग आला आहे. तेही सरकारने स्टँम्प डय़ुटी कमी करण्याचा घेतलेला निर्णय व अन्य काही नियम सरकारने केले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसायामध्ये गुंतवणूक करणाऱयांची संख्या हळू हळू वाढत आहे. शहरात बांधकाम दिसत आहेत. नव्यानेच हद्दवाढ झाली आहे. त्याही भागात नवीन बांधकामे सुरु झालेली आहेत. त्यांच्याकडे अजून कोणताही कर लागू केला नसला तरीही दोन वर्षानंतर कर पालिकेला द्यावा लागणार आहे. हे गृहीत धरुनच बांधकामे सुरु आहेत.
खूपच मंदी आहे या व्यावसायात
सातारा शहरात लॉकडाऊन काळात खूपच मंदी आहे या व्यवसायात. दर तेच असले तरीही कचा माल, कामगार नसल्याने लॉक डाऊन काळात गुंतवणूकदार भेटत नव्हते. त्यामुळे शहरात मोठमोठय़ा स्कीम सुरु नव्हत्या. आता सुरु असलेल्या सर्वच स्कीम या जुन्याच आहेत.
सयाजी भेसले बांधकाम व्यवसायिक
पालिकेकडे गत सहा माहिन्यात 247 बांधकाम परवाने
सातारा पालिकेकडे सातारा शहरात गेल्या सहा महिन्यात बांधकाम परिवाने केवळ 247 एवढे आले होते. जानेवारीपासून मात्र निश्चित वेग वाढला आहे. नवीन इमारती बांधण्याचे काम सध्या शहरात अनेक ठिकाणी सुरु आहे.