वृत्तसंस्था/ शिकागो
अमेरिकेतील शिकागो शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात एका 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वजण कौटुंबिक कार्यक्रमासाठी जमले असताना गोळीबार सुरू झाला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या काळात 18 गोळ्या झाडण्यात आल्या. ही टोळीशी संबंधित घटना असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदीसोबतच विशेष दलाची नियुक्ती करण्यात आली आहे.