प्रतिनिधी / पणजी
गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत, सरचिटणीस मिलींद गावस, व उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर यांनी महिला व बालकल्याण संचालनालयाच्या संचालिका दिपाली नाईक यांची भेट घेऊन गुळेली सत्तरी येथील अंगणवाडी सेविका लता गांवकर या विकलांग महिलेची तडकाफडकी केलेली बदली रद्द करावी असे निवेदन सादर केले. आणि ही बदली त्वरीत मागे घ्यावे अशी मागणी देखील यावेळी शिवसेनातर्फे करण्यात आले.
या बदलीविषयी बोलताना दिपाली नाईक यांनी सांगितले की ही बदली राजकीय प्रेरित नसून ही बदली खात्याच्या काही कर्मचाऱयांच्या निष्काळजीपणामुळे झाले आहे. यासदर्भात चौकशी करुन निर्णय घेणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केल्याचे कामत यांनी सांगितले.
रविवारी आम्ही गुळेली येथील लता गांवकर यांच्या राहत्या घरी भेट घेऊन तीची परीस्थिती स्वःताह बघितले आहे. तीची परीस्थिती बिकट असून अशावेळी तिची बदली करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही बदली त्वरीत मागे घ्यावी असे आम्ही नाईक यांना कळविल्याचे जितेश कामत यांनी सांगितले.