दोडामार्ग – वार्ताहर-
मणेरी – कुडासे मार्गावरील ‘पेड्डा’ देवस्थानातील पुरातन पितळीच्या घंटा चोरट्यांनी पळविल्या. काही महिन्यांपूर्वी मणेरी येथील मंदिरातील घंटा चोरीस गेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा आता या घंटा गायब झाल्या आहेत. मणेरी ते कुडासे मार्गावर श्री. पेढेश्वर मंदिर असून पेड्डा या नावाने ते प्रचलित आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी हे विशेष आदराचे स्थान आहे. अनेकजण या ठिकाणी नवसा पित्यर्थ घंटा देखील बांधतात. अशांतीलच काही घंटा अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या आहेत भरपालवाडी मधील अक्षय राऊत यांना या घंटा चोरीस गेल्याचे प्रथम दर्शनी आढळले. या संदर्भात अद्याप पोलीसात तक्रार दाखल झाली नाही.