वार्ताहर /कुदेमनी
राज्य पातळीवरील आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कुदेमनी गावातील संकेत शिवाजी पाटीलने द्वितीय क्रमांक व वैष्णव काकतकरने तृतीय क्रमांक मिळविला.
बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे मुधोळ येथे राज्यपातळीवरील आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा नुकत्याच झाल्या.
संकेत पाटील हा बेळगाव येथील आरएलएस महाविद्यालयामध्ये बीएससी पदवीचे शिक्षण घेत असून 92 कि. वजन गटात ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
त्याला लहानपणापासून कुस्तीची आवड असून शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून तो परिचित आहे. यापूर्वी त्याने राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेत यश मिळवून त्याने आपला लौकीक कायम राखला आहे.
वैष्णव काकतकर हा बेळगाव येथील दमशि मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालयाचा विद्यार्थी असून 80 कि. वजन गटात तिसऱया क्रमांकाचा मानकरी ठरला. विद्यापीठाच्या वतीने प्रमाणपत्र व पदक देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
गावात सरावासाठी तालीम नसली तरी या दोघांनी शाळेच्या पटांगणात जमेल तसा सराव करून या स्पर्धेत चमक दाखविली, हे उल्लेखनीय आहे.