प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील डावखोल कडवठार येथे घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
संगमेश्वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8 ते 10.30 दरम्यान जयेश अनंत पालांडे हे तुकाराम वाडकर यांच्या घरामध्ये शेतीचे काम आटोपल्यामुळे जेवणासाठी आई सोबत गेले होते. रात्री घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून गोदरेजच्या कपाटातील 60 हजार रुपयांची रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबतची फिर्याद जयेश पालांडे (31, डावखोल, कडवठार) यांनी डिंगणी पोलीस दूरक्षेत्राला दिली. त्यानुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सी. टी. कांबळे करत आहेत.