प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार डॉ. एम. डी. शेकासन (७४) यांचे आज रत्नागिरीत निधन झाले.
मधुमेहाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना काल संध्याकाळी रत्नागिरीत दाखल करण्यात आले होते. आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. गेली ४० पेक्षा अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय होते. समाजाभिमुख पत्रकारिता करण्यात त्यांचा हातखंडा होता. संगमेश्वर तालुका पत्रकार संघात सल्लागार म्हणून कार्यरत राहून अनेक पत्रकारांना मोलाचे स ह कार्य करत होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपला वसा सोडला नाही. त्यांच्या दुःख द निधनाने जिल्हात शोक व्यक्त होत आहे.