ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते कोल्हापूरात (kolhapur) आहेत. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, कोल्हापूर उत्तरचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम (satyajit kadam) यांच्या प्रचारासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) कोल्हापुरात आहेत. आज सकाळी त्यांनी मिसळ पे चर्चा या कार्यक्रमात कोल्हापुरातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) करत असलेल्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं.
यावेळी पत्रकारांनी प्रवीण दरेकर यांना संजय राऊत करत असलेल्या वक्तव्यांविषयी विचारले असता ते म्हणाले, संजय राऊत काय बोलतात त्याला गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. ते प्रत्येकवेळी काही ना काही बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहण्याची आणि लक्ष देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. तसेच संजय राऊत प्रत्येकवेळी जे काही बोलत असतात कालांतराने त्यांचा फोलपणा जनतेसमोर येते. त्यामुळे त्यांच्या वक्यव्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं असे दरेकर म्हणाले.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले, संजय राऊत जे काही बोलतात, टीका करतात याविषयी त्यांच्याकडे कोणतेच पुरावे नसतात. ते करत असलेले आरोपही बिनबुडाचे असतात. तसेच ते करत असलेल्या वक्तव्यांना कोणताच आधार नसतो, ते असेच मनाला येईल ते बोलत असतात, असा टोलाही दरेकरांनी यावेळी लगावला.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आणि सोमय्यांनी केलेल्या आरोपांमुळे राऊत चांगलेच संतापले आहेत. त्यांनी बुधवारी आयएनस विक्रांतमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्यांवर (kirit somayya) निशाणा साधला. यावर बोलताना दरेकर म्हणाले, संजय राऊतांनी INS विक्रांतच्या जमा केलेल्या निधीत सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. यामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. कालांतराने INS विक्रांतचा फोलपणा देखील जनतेसमोर येईल असा विश्वास यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले, राऊत स्वतःवर कारवाई होत आहे म्हणून जर इतरांवर आरोप करत असतील तर ते चुकीचं आहे. आपल्यावर होणाऱ्या आरोपांवर पडदा टाकण्यासाठी तुम्ही इतरांवर आरोप करणे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही आपल्यावर कारवाई होते म्हणून इतरांवर आरोप करत असाल तर न्यायव्यवस्था तुम्हाला तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही, असा खोचक टोलाही दरेकरांनी राऊतांना लगावला.