क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
वाघुर्मेच्या सत्पुरूष स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या अखिल गोवा पातळीवरील टी-10 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत कालेच्या खुटकर ब्रदर्सने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेचे आयोजन वाघुर्मेच्या ग्रीन पार्क मैदानावर करण्यात आले आहे. पहिल्या लढतीत खुटकर ब्रदर्सने उसगावच्या गुरुनाथ स्पोर्ट्स क्लबचा 3 विकेट्सनी पराभव केला तर दुसऱया सामन्यात पिर्णाच्या ला-पिर्णाचा 6 विकेट्सनी पराभव केला.
संक्षिप्त धावफलकः गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब, 10 षटकात 7 बाद 86 (अभिजीत गावकर 27, वृषभ नाईक 15, परेश नाईक 12 धावा. भागेश रेकडो 4, वासू खुटकर व प्रणाम देसाई प्रत्येकी 2 बळी) पराभूत विरूद्ध खुटकर ब्रदर्स, 9 षटकात 7 बाद 86 (रणजीत खुटकर 22, अंकुश खुटकर 18, वासू खुटकर 13, आर्यन ख्रुटकर व शांबा खुटकर प्रत्येकी 10 धावा. वृषभ नाईक 3, अभिजीत गावकर 2, प्रदीप नाईक 1 बळी). सामनावीर – रणजीत खुटकर (खुटकर ब्रदर्स).
ला-पिर्णा, 10 षटकात 5 बाद 82 (रोहित परब 40, सागर सावंत 23 धावा. सतेंद्र शेळके व प्रणाम देसाई प्रत्येकी 2 बळी) पराभूत विरूद्ध खुटकर ब्रदर्स, 9 षटकात 4 बाद 84 (प्रणाम देसाई 20, शांबा खुटकर 17, तेजल बोरकर 13, आर्यन खुटकर 11 धावा. सागर सावंत 2, तुषार सावंत 1 बळी). सामनावीर- प्रणाम देसाई (खुटकर ब्रदर्स).