गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होती नोंद
मागील शतकात घोडय़ांना शासकांची सवारी मानले जायचे आणि युद्धात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने इतिहासात त्यांचे महत्त्वाचे स्थान राहिले आहे. जगातील सर्वात उंच अश्व बिग जेकचे निधन झाले आहे.
बिग जेक 20 वर्षांचा होता आणि बेल्जियम पॉयनेटच्या स्मोकी हॉलो फार्ममध्ये राहत होता. बिग जेकचा मृत्यू दोन आठवडय़ांपूर्वी झाला होता अशी माहित फार्मचे मालक जैरी गिल्बर्ट यांच्या पत्नी वॅलिसिया यांनी दिली आहे. बिग जेकच्या मृत्यूची तारीख आम्ही आठवणीत ठेवणार नाही, कारण आमच्या परिवारासाठी ही दुःखाची घटना असल्याचे गिल्बर्ट परिवाराकडून सांगण्यात आले आहे.
बिग जेकची उंची 6 फूट 10 इंच इतकी होती. त्याचे वजन 2,500 पाउंड म्हणजेच 1,136 किलो होते. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डृसने 2010 मध्ये बिग जेकला जगातील सर्वात उंच अश्वाच्या स्वरुपात गौरविले हेत. बिग जेक एक सुपरस्टार आणि प्रत्यक्षात एक उमदा प्राणी होता असे जेरी गिल्बर्ट यांनी म्हटले आहे.
बिग जेकचा जन्म नेब्रास्कामध्ये झाला होता, जन्मावेळी त्याचे वजन 240 पाउंड म्हणजेच 109 किलो होते. एका सर्वसाधारण बेल्जियन अश्वाच्या पिल्लूच्या तुलनेत हे वजन 45 किलोग्रॅमने अधिक होते. बिग जेकचा स्टॉल रिकामी ठेवून आणि त्याचे छायाचित्र नाव नमूद असलेले निशाण लावणार असल्याचे गिल्बर्ट म्हणाले. बिग जेक अत्यंत शांत प्रवृत्तीचा होता, बिग जेकच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.