ऑनलाईन टीम / किव्ह :
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. सातव्या दिवशीही युद्धाची धग तीव्र आहे. दरम्यान, युक्रेनने मागील सहा दिवसात 6000 रशियन सैनिक मारल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असतानाच रशियानं त्यांच्या न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अणवस्त्र युद्धाच्या दिशेनं जाणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यातच आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो यांनी तिसरं महायुद्ध हे अणवस्त्रांचं असून विनाशकारी असेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे या युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठय़ावर पोहचल्याचे काही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.