प्रतिनिधी / सांगली
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेचे माजी सभापती नाना पटोले यांचे कवलापूर विमानतळावर काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.
सांगली शहरातील विविध कार्यक्रमासाठी नाना पटोले रविवारी सांगलीत दाखल झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, तालुका प्रमुख गजानन मोरे, बुधगाव चे शहरप्रमुख सतीश मस्के, बिपिन कदम प्रेम चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
नाना पटोले यांच्याकडून वसंतदादा पाटील यांना अभिवाद
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी सांगली दौऱ्यावर आले असता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
यावेळी त्यांच्या समवेत वसंत दादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते, आदिनाथ मगदूम, नगरसेविका वहिदा नायकवडी, नगरसेविका शुभांगी साळुंखे, रवींद्र खराडे, काँग्रेस सेवादलाचे अजित ढोले आदी उपस्थित होते. यावेळी पटोले यांनी सहकार महर्षी विष्णु अण्णा पाटील, माजी मंत्री मदन पाटील, माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांच्या समाधीस्थळाचेही दर्शन घेतले.