सांगली जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 53 वाढलेः ग्रामीण भागात 184 वाढले
प्रतिनिधी / सांगली
बुधवारी जिल्ह्यातील कोरोनाचे नवे 237 रूग्ण वाढले, तर 390 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू झाला. आजअखेर जिल्ह्यातील एक हजार 546 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर 41 हजार 994 रूग्ण झाले आहेत. यातील 36 हजार 774 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचारात तीन हजार 674 रूग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात नवे 53 रूग्ण आढळले
महापालिका क्षेत्रात बुधवारी नवीन 53 रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सांगली शहरात 45 आणि मिरज शहरात आठ रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता चांगलीच आटोक्यात आली आहे. सरासरी 50 रूग्ण दररोज वाढत आहेत. आजअखेर महापालिका क्षेत्रात 15 हजार 602 रूग्णांना कोरोना झाला आहे. त्यामध्ये 87 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 184 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्ण संख्या आटोक्यात येत असतानाच ग्रामीण भागातही रूग्णसंख्या आता हळूहळू कमी होत चालली आहे. बुधवारी ग्रामीण बागात 184 नवीन रूग्ण वाढले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यात 20, जत तालुक्यात 19 नवीन रूग्ण वाढले. कडेगाव तालुक्यात 10 कवठेमहांकाळ तालुक्यात नऊ, खानापूर तालुक्यात 29 तर मिरज तालुक्यात 17 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. पलूस तालुक्यात 14 शिराळा तालुक्यात 15, तासगाव तालुक्यात 29 आणि वाळवा तालुक्यात 22 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामीण भागातही रूग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाल्याने जिल्हÎाला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार सुरू असताना आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कडेगाव तालुक्यातील एकाचा कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यातील एकाचा , पलूस तालुक्यातील एका आणि वाळवा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर तासगाव तालुक्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यातील एक हजार 546 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.68 टक्के इतका झाला आहे.
390 जण कोरोनामुक्त
बुधवारी जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱया 390 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आजअखेर जिल्ह्यातील 36 हजार 774 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 87 टक्के रूग्णांनी कोरोनाला हरविले आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात फक्त तीन हजार 674 रूग्ण उपचार घेत आहेत.
दोन हजार 497 जणांचे स्वॅब घेतले
जिल्ह्यात बुधवारी दोन हजार 497 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये 888 आरटीपीसी स्वॅब तपासले आहेत. तर एक हजार 609 रॅपीड ऍण्टीजन स्वॅब घेण्यात आले आहेत. यामध्ये 237 रूग्ण आढळून आले आहेत.
परजिल्ह्यातील दोन रूग्णांचा मृत्यू
परजिल्ह्यातील रूग्णांच्यावरही जिल्हÎात उपचार करण्यात येत आहेत. बुधवारी नवीन तीन रूग्ण वाढले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्हÎातील एक आणि बेळगाव जिल्हÎातील दोघांचा समावेश आहे. आजअखेर परजिल्ह्यातील एक हजार 291 रूग्णांच्या उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक हजार 49 रूग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचारात 42 रूग्ण आहेत. उपचार सुरू असताना बुधवारी दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एक आणि बेळगाव जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. आजअखेर परजिल्ह्यातील 200 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.
नवीन रूग्ण 237
उपचारात 3674
बरे झालेले 36774
एकूण 41994
मृत्यू 1546