प्रतिनिधी / सांगली
तासगाव- भिलवडी मार्गावर एका अज्ञात व्यक्तिचा दोन दिवसापूर्वी झालेल्या खूनाचा उलगडा झाला आहे. मयत व्यक्ती ही मंगसुली येथील जेसिबी मालक आहे त्याचे नाव हरी येदुपाल पाटील असे आहे . हा खून त्याच्या कडे असणाऱ्या जेसिबी चालकानेच केला आहे संशयित म्हणून सुनील राठोड आणि त्याची पत्नी पार्वती राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे.
तासगाव हद्दीत आठ जून रोजी चेतना पेट्रोल पंपानजीक सुभाष लुगडे यांची शेतजमीन आहे. याच शेतात नव्याने एक विहीर पाडण्यात आली आहे. या विहिरीत काळ्या प्लास्टिक कागदात गुंडाळेला एक मृतदेह तरंगताना शेतमालकांना दिसला,त्यानी तासगाव पोलीस स्टेशनला कळवले, त्या नंतर. सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स च्या मदतीने हा मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला त्यावेळी खून करून मृतदेह प्लास्टिक कागदात लपेटून विहिरीत टाकण्यात आला होता