कुपवाड / प्रतिनिधी
बामनोळी गावातील माजी तंटामुक्त अध्यक्ष जगन्नाथ अमृता पाटील वय ६३, रा.मायाक्कानगर यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
कुपवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जगन्नाथ पाटील हे बामनोली गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष होते. त्यांचे बामणोली येथे ‘आकाश टी स्टॉल’ नावाने हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी हॉटेलचे शटर बंद करून आतील लोखंडी छताच्या अँगलला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच बामनोली परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली ? याबाबत रात्री उशिरापर्यंत नेमके कारण समजू शकले नाही. त्यांचा मुलगा उमेश जगन्नाथ पाटील रा. बामनोली) यांनी कुपवाड पोलिसात वर्दी दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.