प्रतिनिधी / मिरज
शहरातील भाजपा नेते मकरंद देशपांडे यांची भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुखपदी निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवड जाहीर केली.
मकरंद देशपांडे हे भाजपाच्या स्थापनेपासून पक्षात काम करीत आहेत. यापूर्वीही त्यांनी पक्षात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी उत्कृष्ठ संघटन केले आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजराथ, कर्नाटक येथील निवडणुकीतही पक्षादेश पळून त्यांनी काम केले आहे. दुष्काळग्रस्त लातूरला मिरजेतून रेल्वेने पाणी देण्याची त्यांची संकल्पना मोलाची ठरली होती. त्यांच्या संघटन कौशल्याची दाखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.