प्रतिनिधी / सांगली
28 सप्टेंबर 2021 रोजी भारतीय डाक विभागाची विभागीय स्तरावरील डाक अदालत सकाळी 11 वाजता प्रवर डाकघर अधिक्षक सांगली यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तक्रारी स्विकारण्याचा अंतिम 10 सप्टेंबर 2021 आहे. अशी माहिती डाकघर सांगली विभागाचे प्रवर अधिक्षक अ. रा. खोरोटे यांनी दिली.
पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल डाक अदालतमध्ये घेतली जाणार आहे. विशेषत: टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. संबंधितांनी ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असूल त्याचे नाव व हुद्दा याचा स्पष्ट उल्लेख करून मूळ अर्जाच्या प्रतीसह 10 सप्टेंबर 2021 पर्यंत अ. रा. खोराटे, प्रवर अधिक्षक डाकघर सांगली विभाग, सांगली 416416 या पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाने तक्रार पाठवावी, असे . खोराटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.