प्रतिनिधी / सांगली
कोरोना महामारीचा झपाट्याने वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन गरजू रुग्णांना उपचाराची सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. गेल्या दहा दिवसात जिल्ह्यात ४२ व्हेंटिलेटर्स व २० बायपॅप मशीन्स उपलब्ध करण्यात आल्या असून शासकीय रुग्णालयांसह विविध खाजगी रुग्णालयांना यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली.
यातील ३२ व्हेंटिलेटर प्रशासनामार्फत खरेदी करण्यात आली असून यामधील २ सीएसआर फंडातून खरेदी करण्यात आली आहेत. तर १० व्हेंटिलेटर्स वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजसाठी राज्य शासनाकडून उपलब्ध झाली आहेत.