बांदा/प्रतिनिधी-
साऊथ कोकण डिस्टीलरीज या आस्थापनेेच्या काचेच्या बाटल्या अलीकडेच झालेल्या पुरामुळे भातशेतीत व परिसरात घुसल्याने नुकसान झाले आहे. सदर आस्थापना त्या काचा व बाटल्या आपल्या नसल्याचे सांगितले.तर याबाबत विचारणा केल्याने सदर आस्थापना मालकाने नोकरी करणाऱ्या स्थानिक युवकांना फॅक्टरीत घेण्यास मज्जाव करत त्यांना कामावर घेणार नसल्याचे सांगितले.
त्यामुळे आस्थापना मालक व ग्रामस्थ यांच्यात वाद निर्माण झाला आहे.त्यावर आपण तोडगा काढावा असे लेखी निवेदन इन्सुली सरपंच गंगाराम उर्फ तात्या वेंगुर्लेकर यांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले आहे. तर यावर योग्य तो निर्णय न झाल्यास आम्हांला आंदोलनाचा विचार करावा लागेल असेही त्यात म्हटले आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सरपंच गंगाराम उर्फ तात्या वेंगुर्लेकर, उपसरपंच काका चराटकर, माजी उपसरपंच नाना पेडणेकर,सदा राणे, विभागप्रमुख फिलिप्स रॉड्रीग्स, सचिन पालव आदी उपस्थित होते