साटेली – भेडशी / प्रतिनिधी:
महाविकास आघाडी सरकार कडून प्राप्त झालेल्या साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीच्या रुग्णवाहिकेचे बुधवारी शिवसेना ,भाजपा , राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस पदाधिकारी ,लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत साटेली भेडशी गावचे मानकरी सदानंद धर्णे व पांडुरंग धर्णे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले. यावेळी उपसभापती सुनंदा धर्णे ,शिक्षण आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी ,साटेली भेडशी सरपंच लखू खरवत ,उपसरपंच गणपत डांगी ,माजी सरपंच नामदेव धर्णे ,शिवसेना उपजिल्हासंघटक गोपाळ गवस ,साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य जेनिफर लोबो ,लक्ष्मी धर्णे ,प्रमिला धर्णे ,सरपंच सेवासंघ जिल्हा संघटक प्रवीण गवस ,विनिता घाडी ,संतोष मोर्ये ,राजू धर्णे ,हेमंत कर्पे ,आपा कामत ,कानू दळवी ,दिपाली दळवी ,महेश धर्णे ,शैलेश दळवी ,माजी उपसभापती लक्ष्मण नाईक ,चेतन चव्हाण ,प्रवीण गवस ,सूर्यकांत धर्णे ,मायकल लोबो ,कल्पना बुडकुले ,सिद्धेश पांगम ,सोमा धर्णे ,दशरथ पडते ,घोटगे सरपंच संदीप नाईक ,कोनाळ सरपंच पराशर सावंत ,बोडदे सरपंच विनायक शेट्ये ,खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर आदी कार्यकर्ते ,पदाधिकारी ,साटेली भेडशी ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यसरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १४ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या होत्या त्याचे वितरण रुग्णवाहिकांचे वाटप पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते ओरोस येथे प्राथमिक स्वरूपात झाले.त्यानंतर या रुग्णवाहिका त्या त्या आरोग्य केंद्रांना देण्यात आले.साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुसज्ज रुग्णवाहिकेची गरज होती त्यासाठी वेळोवेळी मागणी ही करण्यात आली होती.पालकमंत्री उदय सामंत ,खासदार विनायक राऊत ,आमदार दीपक केसरकर यांनी या रुग्णवाहिकांसाठी पाठपुरावा केला.दोडामार्ग तालुका शिवसेना संपर्कप्रमुख राजन मोर्ये यांनी पालकमंत्री उदय सामंत ,खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती ,सरपंच सेवासंघ जिल्हा संघटक प्रवीण गवस व ग्रामपंचायत साटेली भेडशी सरपंच लखू खरवत ,उपसरपंच गणपत डांगी यांनी पंचायत समिती दोडामार्ग कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे उपोषणे केली.या त्यांच्या मागणीला यश मिळाले.