ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बॅडमिंटन जगात भारताला अनेक मोठे विजय मिळवून देणारी सायना नेहवालने आज आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नवी दिल्ली येथील भाजप मुख्य कार्यालयात सायना नेहवालनं भाजपमध्ये प्रवेश केला. सायना नेहवालसोबत तिच्या मोठ्या बहिणीनेही यावेळी भाजपात प्रवेश केला.
सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचार करणार असल्याचं सांगितलं जात आहे. हरियाणामध्ये जन्मलेल्या सायना नेहवालचे भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीत नाव घेतले जाते. सायनाने भारतासाठी ऑलिम्पकि आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई केली आहे. 2015 मध्ये सायना नेहवाल जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर होती.
याआधी भाजपमध्ये कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगट यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. या दोघांनी हरियाणा लोकसभा निवडणुकही लढवली होती.