वेलिंग्टन
2027 नंतर येणाऱया युवा पिढीला भविष्यात सिगारेट ओढता येणार नाही अशा प्रकारचा एक कायदा न्युझीलँड सरकार आणू पाहत आहे. याच्या तयारीला न्युझीलँड सरकारने वेग दिला असल्याची माहिती आहे. तंबाखू उद्योगांवर संपूर्णपणे बंदीची कारवाई करण्याची योजना सरकारने आखली असून युवकांना नुकसानकारक अशा सिगारेटपासून मुक्त करण्याचा इरादा रचला जात असल्याची माहिती आहे. नव्या होणाऱया कायद्यानुसार 2027 वर्षापासून 14 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना सिगारेट खरेदी करता येणार नाही. 50 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने 9 डिसेंबरला नव्या कायद्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तंबाखूच्या किरकोळ विपेत्यांवर निर्बंध लादण्यासोबतच सर्व उत्पादनांमधील निकोटिनचे प्रमाणही कमी करण्याचा विचार सरकारने चालवला आहे. युवकांनी कधीही धूम्रपान करू नये यासाठी आम्ही कटिबद्ध असून नव्या युवापिढीला तंबाखू विक्री करणाऱया उत्पादकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे आरोग्य मंत्री आयेशा वेर्रल यांनी सांगितले. सरकारी आकडेवारीनुसार सध्याच्या काळामध्ये पंधरा वर्षापेक्षा कमी वयाचे 116 टक्के लोक देशात धूम्रपान करतात असे दिसून आले आहे. 2022 मध्ये जूनमध्ये संसदेत कायद्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.