प्रतिनिधी/ सातारा
दि युनायटेड वेस्टर्न बँकेने संस्थापक कै वा ग तथा अण्णासाहेब चिरमुले यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या चिरमुले ट्रस्ट तर्फे बँकिंग, इंडस्ट्री, व्यवसाय अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाया व्यक्तीस दरवर्षी चिरमुले पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
ज्येष्ठ साहित्यिक, कवी व फिल्म इंडस्ट्रीत भावपूर्ण व अर्थवाही दिग्दर्शक म्हणून दीर्घकाळ ख्यातनाम असलेले पद्मभूषण गुलजार यांना आज मुंबई येथे अनौपचारिक समारंभात चिरमुले ट्रस्टचे माजी विश्वस्त व ज्येष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले यांचे हस्ते 2020 सालासाठीचा चिरमुले पुरस्कार प्रदान करण्यात आला,
रु 1 लाख व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय सातारी कंदी पेढय़ांचा हार व समर्थप्रसाद म्हणून रामनामी शाल यांचाही समावेश होता
ङगुलजार यांचे योगदान अपुर्वङ. – आपण फिल्म उद्योगासाठी लेखक,कवी व दिग्दर्शक म्हणून दिलेले योगदान अपूर्व आहेच शिवाय या सर्वातही आपण आयुष्यभर मानवता ,समता व राष्ट्रप्रेमाची संथा दिली आहे त्यामुळेच हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद वाटत आहे, असे मनोगत सर्वांनी ट्रस्टतर्फे व्यक्त केले.
ङसातारकरांशी संवाद साधणार – गुलजारङ
मुंबई म्हणजेच महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे अण्णासाहेब चिरमुले या द्रष्टय़ा मराठी बँकर च्या नावाचा पुरस्कार आपण मला दिलात याबद्दल मी कृतज्ञ आहे, खरंतर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सातायाला येण्याची माझी इच्छा होती पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. पण भविष्यकाळात मी नक्की तेथे येऊन सातारकरांशी संवाद साधणार आहे. असे भावनिक बोलून गुलजार यांनी त्याचा स्वीकार केला. तसेच आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ” धूप आने दो ” या मराठी अनुवादित पुस्तकाच्या प्रती सर्वाना भेट दिल्या यापूर्वी या पुरस्काराने, रतन टाटा, डॉ नारायण मूर्ती , राहुल बजाज,एकनाथ ठाकूर,डॉ अनिल काकोडकर, डॉ मनमोहन सिंग,सी रंगराजन, ललिता गुप्ते,अरुण शौरी,आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.