ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळेंनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.’