प्रतिनिधी/ सातारा
शहराच्या सोनगाव कचरा डेपोला दि. 22 रोजी दुपारी 12 वाजता अचानक आग लागली. ती आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचा आग्निग्निशमन दल आणि आरोग्य विभाग आटोकाट प्रयत्न करत आहे. बहुतांशी आग आटोक्यात आणण्यात आल्याचा दावा पालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. अजून ही शुक्रवारी उशिरापर्यंत धूर निघत होता.
सातारा शहरातून दररोज तयार होणारा सहा टन कचरा सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. या कचऱयाला दि.22 रोजी दुपारी 12 वाजता अचानक मिथेन वायू तयार होऊन पेट घेतल्याने आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचा अग्निग्नशमन दल, वाहतूक विभागाची सर्व वाहने प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाचे बंब आणि जेसीबीच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन सूचना केल्या होत्या. कचरा डेपोत वरच्या आणि खालच्या बाजूने पाणी मारत जेसीबीने कचरावर खाली करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. शुक्रवारी सायंकाळी उशिरा पर्यंत बहुतांशी ही आग आटोक्यात आणल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
आरोग्य निरीक्षक कायगुडे अन अग्निशमनचे साळुंखे हे ऑन दि फिल्ड
कचरा डेपोला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे मोठे दिव्य असून त्या धुरात पुढे जाऊन काम करणे तसे धोकादायक असते. मात्र, सुमारे 17 एकर जागेतील हा कचरा डेपो असून ती आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेसोबत काम करण्यासाठी दस्तुरखुद्द आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे आणि अग्निग्नशमन अधिकारी सौरभ साळुंखे हे ऑन दि फिल्ड आहेत.