तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात कोरोनाबाधित आणखी सहा रुग्ण आढळले आहेत. बापूजी नगर 2, शास्त्रीनगर 1, लष्कर 1, भारतरत्न इंदिरा नगर 1 भागातील आहेत. नवीन कोरोनाबाधित पॉझिटिवमध्ये 4 पुरुष, 2 महिलांचा समावेश आहे. शहरातील कोरोनाच्या रुग्णाची एकुण संख्या 39 झाली आहे. यातील 3 रुग्ण मृत झाले आहे. उर्वरित 36 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी दिली.
सोलापूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाप्रशासनाच्यावतीने 24 एप्रील ते 27 एप्रीलदरम्यान सोलापुरात संपूर्ण संचारबंदी, हद्द बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असेहि जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. सोलापुरात यापूर्वी कोरोनाबाधीतांची संख्या 33 होती. आता यामध्ये 6 रुग्णांची भर पडली असून आता सोलापुरात 39 कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी तीघांचा मृत्यू झाला आहे. नवीन सापडलेले रूग्ण हे कुर्बान हुसेन नगर, बापूजी नगर, लष्कर, शास्त्रीनगर, भारतरत्न इंदिरा नगर येथील असून हा पूर्ण परिसर सील करण्यात आला असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.
सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 1029 व्यक्ती होते त्यापैकी 805 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी 768 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.तर 39 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापुरात नव्याने सहा कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे सोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे..
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वरटाईनमध्ये: 1207
आयसोलेशन वार्डात – 1029
एकूण अहवाल प्राप्त : 805
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 768
आतापर्यंतअहवाल पॉझीटीव्ह : 39
मृत : 03