तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
येथील सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकार्यांना साडेसात लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार व सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या दोन पोलीस अधिकार्यांची नावे आहेत. सलगरवस्ती पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुध्द एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक पवार व खंडागळे या दोघांनी तक्रारदाराकडे साडेसात लाख रुपयांची लाच मागितली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार नोंदविली. त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि खंडागळे यास लाच घेताना जेरबंद करण्यात आले.
याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक पवार यांना अटक करण्यात आली आहे