अल्कानार
मुसळधार पावसासह चक्रीवादळाने स्पेनला नुकताच दणका दिला असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. स्पेनच्या उत्तरपूर्व प्रदेशांमध्ये प्रचंड पाऊस झाल्याने कारसह हजारो वाहने रस्त्यावरील पाण्यातून वाहून गेल्याचे दिसून आले आहे. जर्मनीच्या दोन महिला मलोर्का येथील बेटावरून बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली असून सदरच्या महिला पाण्यात बुडाल्या असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जोरदार पावसासह वादळाने घरांचे, व्यावसायिकांच्या गाळय़ांचे पत्रे उडून पडले. पावसाचा वेग इतका प्रचंड होता की रस्त्यांना नदीचे रुप आले. अल्कानार शहराची मोठय़ा पावसाने वाताहत झाली. रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मुसळधार पावसाने झोडपले. रस्त्यांनी नदीचे रुप घेतल्याने काही हॉटेलमधील नागरिकांना तर वरच्या मजल्यावर जाणे भाग पडले. कित्येक मोटारी यातून वाहून गेल्याचे समजते. तिकडे न्यूयॉर्कलाही इडा चक्रीवादळाचा फटका बसला असून मालमत्तेचे जबर नुकसान झाल्याचे समजते.