ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘स्लोवेनिया’ हा युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश आहे. स्लोवेनिया सरकारने याबाबतची घोषणा केली आहे.
स्लोवेनिया सरकारने दिलेल्या माहितीनुसार, स्लोवेनियात कोरोना नियंत्रणात आला आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये दरदिवशी सातपेक्षा कमी नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे देशात विशिष्ट आरोग्यासंदर्भातील उपाययोजनांची आवश्यकता नाही. युरोपीय संघाच्या इतर देशांतील लोकांना स्लोवेनियात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना सात दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार नाही. परंतु, ज्या व्यक्ती युरोपीय संघातील सदस्य नाहीत, त्यांना 14 दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे असतील त्यांना देशात येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
स्लोवेनियाची लोकसंख्या अंदाजे 20 लाख आहे. स्लोवेनियामध्ये आतापर्यंत 1464 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर 103 लोकांचा मृत्यू झाला आहे.