तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर व्यापाऱयासह कापड व्यापाऱयाची हनी ट्रपच्या माध्यमातून लूटमारी झाली आहे. अशा पद्धतीने जाळे टाकणाऱया टोळ्या कार्यरत आहेत. त्यातील काही संशयितांना अटकही करण्यात आली आहे. या टोळ्यांनी जिल्ह्यातील इतर काही व्यापारी, उद्योजकांची हॅनी ट्रपव्दारे आर्थिक लूट केली असल्यास संबंधितांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून तत्काळ तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. तक्ररदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दिवसेदिवस सोशल मीडियाचा वापर करून हनी ट्रपच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यासाठीच नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाईन संपर्कात राहू नये, फेसबुक, व्हॉटस्अप व इतर मीडियावर ओळखीच्या लोकांशीच संपर्क ठेवावा. सराईत गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणी व काही महिलांना हाताशी धरून नोकरदार, व्यापारी, उद्योजकांची फसवणूक करीत असल्याचे गंभीर प्रकार उघड होत आहेत, यासाठी नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
अटकेतील संशयितांची माहिती घेण्याचे काम सुरू
जुना राजवाडा पोलिसांनी हनी ट्रप प्रकरणात अटक केलेल्या सहा संशयितांनी यापूर्वी यापूर्वी आणखी किती जणांची फसवणूक केली आहे? याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पण बदनामीच्या भीतीने फसवणूक झाले लोक तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येत नाहीत. मात्र कोणीही घाबरू नये, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यासाठी यावे, यामुळे लूट, फसवणूक करणाऱयांना लगाम घालता येईल. त्यांना अटक करून जास्तीत जास्त शिक्षा करता येईल, असेही बलकवडे यांनी सांगितले.