वार्ताहर /हलगा
हलगा येथे दुपारी 3 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाच्या चढतीला खाली ऊस वाहतूक करणाऱया ट्रकचा ब्रेकफेल झाल्यामुळे हा अपघात सुवर्ण विधानसौधसमोर घडला. ट्रक ओव्हरटेक करणाऱया कँटरला आदळून महामार्गाच्या शेजारील सर्व्हिस रोडच्या गटारीत येऊन थांबल्याने मोठा अनर्थ टळला. चालकाचा ताबा सुटून घडलेल्या अपघातात समोरच्या बाजूला ट्रकचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असले तरी कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. या अपघातात ट्रकचालक व अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर घटनेची नोंद बागेवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.