वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर प्रतिनिधी बेळगाव हिंडलगा रोडवरील महात्मा गांधी पुतळय़ाजवळ दुचाकी सायकलला धडकल्याने सावंतवाडी तालुक्मयातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री हा अपघात घडला असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. जयराम लक्ष्मण सावंत (वय 65, मूळचा रा. सावंतटिंब-सांगेली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विनायकनगर परिसरात त्यांचे वास्तव्य होते. मंगळवारी रात्री दुचाकीवरून जनावरांना खरकटे घेऊन जाणाऱया एका दुचाकीस्वाराने सायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला. मृताची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी छायाचित्र दाखवत गणेशपूर, विनायकनगर, हिंडलगा परिसरात चौकशी केली. त्यावेळी विनायकनगर येथे ओळख पटविण्यात आली. बुधवारी दुपारी सावंतवाडी येथील त्यांचे नातेवाईक बेळगावात दाखल झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली. माजी नगरसेवक पंढरी परब यांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली. पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा पुढील तपास करीत आहेत.
Previous Articleपोलीस अधिकाऱयांच्या बदल्या
Next Article डिसेंबरअखेर सुरत विमानसेवेला होणार सुरुवात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.