- 26 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध कायम
ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळच्या बैठकीत शनिवारी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रदेशात जारी असलेला कोरोना कर्फ्यू 26 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यापूर्वी कोरोना कर्फ्यू 17 मे च्या सकाळी 6 वाजेपर्यंत लावण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत आणखी एक निर्णय घेण्यात आला की, आठवड्यात आता 3 तासांसाठी केवळ दोन दिवस म्हणजेच मंगळवारी आणि शुक्रवारी हार्डवेअरची दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत.
तर अन्य दुकाने पहिल्या प्रमाणेच दिवसात तीन तास सुरू असणार आहेत. या सोबतच शहरी भागात जेथे एका निगमचे डेपो आहेत, तिथे अंतिम संस्काराच्या विधीसाठी निःशुल्क लाकडे दिली जाणार आहेत. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी लाकडे कापण्यास परवानगी असेल तिथे लाकडे कापली जातील.
शहर विकासमंत्री सुरेश भारद्वाज यांनी सांगितले की, प्रदेशातील रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन आणि औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशातील नागरिकांना लग्न समारंभ स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आणि हे शक्य नसल्यास घरच्या घरी केवळ 20 लोकांना लग्न समारंभात उपस्थित राहता येणार आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.