वीजबिल भरण्यास झाली सुरुवात : थर्मल स्क्रिनिंग करूनच नागरिकांना कार्यालयात प्रवेश
प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमच्या रेल्वेस्टेशन येथील कार्यालयातील एका कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्यामुळे शुक्रवारी हे कार्यालय सीलडाऊन करण्यात आले होते. तीन दिवसांनंतर सोमवारपासून हे कार्यालय पुन्हा सुरळीत पद्धतीने सुरू करण्यात आले. शहर उपविभाग 1 व 2 मधील विजेचे बिलभरणा केंद्रही सुरू करण्यात आले आहे.
बेळगावमधील सरकारी कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बुडा कार्यालय, मनपा तसेच उपनोंदणी कार्यालयानंतर हेस्कॉम कार्यालयातही कोरोना रुग्ण सापडला. यामुळे 3 दिवस हे कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय हेस्कॉमच्या वरि÷ अधिकाऱयांनी घेतला होता. यामुळे कार्यालयातील बिलभरणा केंद्रही बंद करण्यात आले होते.
सोमवारपासून कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे. थर्मल स्क्रिनिंग करूनच नागरिकांना कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. बिल भरण्यासाठी नागरिक एटीपी केंद्रावर दाखल झाले होते.