खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुक्मयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पोलीस प्रशासनाने आता गांभीर्याने दखल घेतली आहे परप्रांतातून येणाऱया अथवा भारतीय सेनेतील सुटीवर येणाऱया प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. याचा संसर्ग हा समूह संसर्गातून होत असल्याने परप्रांतातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला किंवा बेंगळूरहून आलेल्या प्रत्येकाला होम क्वारंटाईन करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. परंतु खानापूर तालुक्मयामध्ये गावागावात क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले. अनेकजण बिनधास्त फिरत आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. यानुसार पोलिसांनी क्रम हाती घेतला असून सोमवारी जांबोटी येथील एकाला इस्लामपूर महाराष्ट्र येथून आलेल्या व्यक्तीवर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे खानापूर तालुक्मयात अनेक जण नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यांना नोटीस बजावून सक्त सूचना देण्यात येत आहेत तरीही त्या व्यक्तीने कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा करण्यात येईल, असा इशारा खानापूर पोलीस उपनिरीक्षक बसगावडा पाटील यांनी दिला आहे तसेच क्वारंटाईन असलेली व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे निदर्शनाला आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.