बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी मंगळवारी केंद्र सरकारने ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येक व्यक्ती १ एप्रिलपासून लसीकरणासाठी पात्र असल्याच्या निर्णयाचे मंगळवारी स्वागत केले.
दरम्यान केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली. १ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सर्व पात्र नागरिकांना लसीकरण करुन सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. एकत्र मिळून आम्ही कर्नाटक कोविड मुक्त करू शकतो,” असे वक्तव्य त्यांनी केले.