ऑनलाईन टीम / ठाणे :
अंबरनाथ मधील एका बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली असल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आर के 1 नावाच्या बिस्कीट कंपनीला सकाळी 6.15 च्या दरम्यान ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या 2 गाड्या आणि एमआयडीसीच्या 2 गाड्या प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात कंपन्यांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच आसनगावयेथील प्लास्टिक कंपनीला आग लागली होती. तर हिंगणा एमआयडीसी परिसरात असलेल्या विको कंपनीला 7 मार्च रोजी आग लागली होती.