ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

आमचं भारतावर प्रेम आहे, भारताने दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय जनतेला अभिवादन केले.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधवर बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका भारताचा खरा मित्र आहे. तसेच अमिरेका नेहमीच भारताचा सन्मान करत आलेला आहे. अमेरिका कायमच भारतासोबत उभी राहीली आहे. तसेच पंतप्रधान मोदींचं काम स्तुत्य आहे. आम्हाला भारताचा गर्व आहे. मोदींच्या नेतृत्वात भारत प्रगती करत आहे. मी प्रेमाचा संदेश घेऊन भारतात आलोय, तर भारतानं जगाला मानवतेचे धडे दिले आहेत.
मोटेरा स्टेडियम बद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, हे जगातील सर्वात मोठं आणि सुंदर स्टेडियम आहे. असे म्हणत ट्रम्प यांनी बॉलिवूडचा उल्लेख केला. भांगडा, शाहरुखच्या डीडीएलजे चित्रपटाचा उल्लेख केला. तसेच आपल्या भाषणात त्यांनी सचिन, विराट कोहलीचे नाव घेतले. तसेच दिवाळी आणि होळी या भारतीय सणांचा उल्लेख करत ते म्हणाले, भारतामध्ये विविधतेत एकता आहे. येथील लोक जगातील एक उदाहरण आहेत.
पुढे ट्रम्प म्हणाले, उद्या पीएम मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करणार, यामध्ये अनेक करारांवर चर्चा