ओस्जेक / ऑनलाईन टीम
क्रोएशियात सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताची नेमबाज राही सरनोबत हिने सुवर्णपदक पटकावले. 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तुल मध्ये तीने हे पदक मिळवले. या स्पर्धेतील क्वालिफिकेशन राउंड झाला. राहीनं 39 गुणांसह अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक जिंकलं. तर फ्रान्सच्या माथिल्डे लामोले हिनं 31 गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. तर रशियाच्या विन्टालिना २८ गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे.
यापूर्वी झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनू भाकर यांनी पाच सुवर्णपदके मिळविली होती. 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारातील मनू आणि सौरभ यांचे हे सहावे पदक आहे. तर भारताच्या देस्वाल आणि अभिषेक वर्मा यांचे कास्यपदक थोडक्यात चुकले.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन पदकांची कमाई केली आहे. पदकतक्त्यात रशिया तीन सुवर्णासह एकूण 7 पदके घेत आघाडीचे स्थान घेतले आहे.
Previous Articleकोल्हापूरसह `या’ जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजना लागू
Related Posts
Add A Comment