आष्टा/वार्ताहर
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आष्टा पोलिसांनी आता एक वेगळीच युक्ती अंमलात आणली आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी आता ड्रोन कॅमेऱ्याचा आधार घेतला आहे. ड्रोन कॅमेऱ्याचा माध्यमातून शहरात विनाकारण फिरणाऱ्याच्यावर वॉच ठेवला जाणार आहे. तसेच मिळालेल्या फुटेजच्या आधारावर कारवाई केली जाणार आहे.
शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने आष्टा पोलिसांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांकडून एक लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच 65 मोटरसायकल आणि एक कारही जप्त केली आहे. त्याचबरोबर दोन हॉटेल वरही कारवाई केली आहे.
कारवाईचा पुढचा भाग म्हणून आता पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचा आधार घेतला आहे. शहरात विविध रस्त्यावर चौकाचौकात या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी दिली. आज, रविवारी दिवसभर शहरात पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून वॉच ठेवला होता. ड्रोन कॅमेर्याचा धसका आता नागरिकांनी घेतला असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे बंद केले आहे.
Previous Articleआ. प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा – नगरसेवक सुरेश पाटील
Next Article बाली बेटांजवळ पाणबुडी बुडाली; 53 सैनिकांना वीरमरण
Related Posts
Add A Comment