स्पेशल इफेक्ट्ससह अँजेलिनाचे होतेय कौतुक
मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नवा चित्रपट ‘इटर्नल्स’चा अंतिम ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांचा तो पाहून उत्साह वाढला आहे. या नव्या ट्रेलरमध्ये सुपरहीरोज म्हणजे सेलेस्टियलची पॉवर दिसून येत आहे.
ऑस्करविजेते दिग्दर्शक क्लोई झाओ यांनी या एपिक ऍडव्हेंचर चित्रपटाची निर्मिती केली आहे. इटर्नल्सच्या ट्रेलरमध्ये हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडेन-इकरस, अँजेलिना जोली, जेमा चॅन आणि सलमा हायेक झळकले आहेत. या चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्स उर्वरित मार्वलच्या चित्रपटांमध्ये अधिक प्रभावी असल्याचे ट्रेलर पाहून समजते. इटर्नल्सच्या ट्रेलर तसेच त्यातील कलाकारांचे विशेषकरून अँजेलिनाचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे.
इटर्नल्समध्ये कुमैल नांजियानी, किट हँरिंगटेन समवेत अन्य काही दिग्गज कलाकार आहेत. चित्रपटात भारतीय अभिनेता हरीश पटेल देखल महत्त्वाची भूमिका साकारत आहे. चित्रपटासाठी इटर्नल्स कॉमिक्सपासून दिग्दर्शक क्लोई झाओ यांनी प्रेरणा घेतली आहे. मार्वलचा हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.