प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमधील चार विद्यार्थिंनींनी 99 टक्के गुण मिळवत शाळेचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. यामध्ये सब से तेज ठरली ती तनाज मोमीन ही विद्यार्थीनी. तनाजने 99.80 टक्के गुण मिळवत राज्यात अव्वल क्रमांकात स्थान मिळवले. तिने मराठीत 100 पैकी 96, संस्कृतमध्ये 100 पैकी 100, इंग्रजीत 100 पैकी 92, गणितात 100 पैकी 100, विज्ञानमध्ये 100 पैकी 99 आणि सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 97 गुण मिळवले. तर चित्रकलेचे सात गुण मिळाले. एकूण 500 पैकी 492 गुण संपादन करत तनाजने उषाराजे हायस्कूलचा झेंडा राज्यात फडकविला.
तनाजच्या शालेय सहकारी असणाऱया गिरिजा गिरीने 99 टक्के, सानिका देशमुखने 99 टक्के आणि अनुष्का शेटे हिने 98.60 टक्के गुण मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
नववीत उत्तीर्ण झाल्यानंतर शाळेत वर्ग सुरू झालेल्या पहिल्या दिवसापासून दहावीच्या परीक्षेची तयारी केली होती. दररोज सहा तास अभ्यास, वाचन, मनन आणि नियमित प्रश्नपत्रिका सोडविल्या. शाळा आणि क्लासमधील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई, वडिलांचे पाठबळ यामुळे यशाला गवसणी घालता आली. – तनाज नाजिम मोमीन, एससीसी टॉपर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमधील चार मुलींनी 99 टक्के गुण मिळवले आहेत. तर 421 पैकी 74 विद्यार्थीनींनी 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवत शाळेचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. तनाज मोमीन हिने 99.80 टक्के गुण मिळवत यशाचे शिखर गाठल. गिरिजा गिरी आणि सानिका देशमुख यांनी 99 टक्के गुण मिळवले. तर अनुष्का शेटे हिने 98.60 टक्के गुण मिळवले. यशस्वी विद्यार्थीनींचे शाळेतील शिक्षक, नातेवाईक यांच्याकडून कौतुक होत आहे.
उषाराजे हायस्कूलचा निकाल 98.54 टक्के लागला आहे. 412 विद्यार्थीनींपैकी 253 विद्यार्थीनींनी विशेष प्राविण्य तर 114 विद्यार्थीनींनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. 33 विद्यार्थीनींनी व्दितीय श्रेणी आणि 6 विद्यार्थीनी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. यशस्वी विद्यार्थीनींना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, मुख्याध्यापिका ए. यू. साठे, उपमुख्याध्यापिका एस. डी. चौधरी, पर्यवेक्षक व्ही. डी. जमेनिस, शिक्षक एस. के. मिठारी यांचे मार्गदर्शन लाभले.
सानिकाला आयएस अधिकारी व्हायचय
उजळाईवाडी श्रीराम कॉलनी येथील सुकन्या आणि उषाराजे हायस्कूलमधील विद्यार्थीनी सानिका देशमुख हिने 99 टक्के गुण मिळवून शाळेचे नाव कमावले. शाळेतील स्कॉलर बॅचमधील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाचन, चिंतन, मनन आणि पेपर सोडवण्यावर भर दिला. नियमित पुस्तकाच्या वाचनातून स्वतः नोटस काढल्या. घरात वडील नितीन व आई मनिषा यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन वहीनुसार अभ्यास केला. मला आयएस अधिकारी व्हायचे आहे. त्यादृष्टीने आत्तापासूनच मी प्रयत्न सुरू केले आहेत.
सानिकाने 99 टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले. तिने मराठीत 100 पैकी 97, संस्कृतमध्ये 100 पैकी 100, इंग्रजीत 100 पैकी 100, गणितात 100 पैकी 93, विज्ञानमध्ये 100 पैकी 97 आणि सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 98 गुण मिळवले. तर चित्रकलेचे तीन गुण मिळाले. एकूण 500 पैकी 492 गुण संपादन करत सानिकाने उषाराजे हायस्कूलचे नाव कमावले आहे.

गिरी गिरीजाचे यश
कसबा बावडा, लाईन बजार येथील रहिवासी आणि उषाराजे हायस्कूलची विद्यार्थीनी गिरी गिरीजा हिने दहावीच्या परीक्षेत 99 टक्के गुण मिळवत व्दितीय क्रमांक मिळवला आहे. शाळेतील स्कॉलर बॅचमधील प्रश्नपत्रिका सोडवल्यानेच चांगले गुण मिळाले आहेत. शाळेतील शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा सराव केला. पाठांतर, लिखान, पुस्तक वाचून नोटस काढल्या. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पाच तास अभ्यास केला. वडील शशिकांन इंजिनिअर तर आई विद्या सेवा रूग्णालय कसबा बावडा इन्चार्ज सिस्टर म्हणून कार्यरत आहे.
गिरीने 99 टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले. तिने मराठीत 100 पैकी 93, संस्कृतमध्ये 100 पैकी 100, इंग्रजीत 100 पैकी 95, गणितात 100 पैकी 96, विज्ञानमध्ये 100 पैकी 98 आणि सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 99 गुण मिळवले. तर चित्रकलेचे सात गुण मिळाले. एकूण 500 पैकी 488 गुण संपादन करत गिरीने उषाराजे हायस्कूलच्या यशाचा आलेख उंचावला आहे.

अनुष्का शेटे
अनुष्काने 98.60 टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले. तिने मराठीत 100 पैकी 98, संस्कृतमध्ये 100 पैकी 100, इंग्रजीत 100 पैकी 95, गणितात 100 पैकी 86, विज्ञानमध्ये 100 पैकी 97 आणि सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 96 गुण मिळवले. तर चित्रकलेचे सात गुण मिळाले. एकूण 500 पैकी 486 गुण संपादन करत सानिकाने उषाराजे हायस्कूलचे नाव कमावले आहे.

उषाराजे हायस्कूलमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलेल्या विद्यार्थीनी व विषय
संस्कृत विषय
तनाज मोमीनः 100 पैकी 100,
सानिका देशमुख ः 100 पैकी 100
गिरी गिरीजा ः 100 ः पैकी 100
अनुष्का शेटे ः 100 पैकी 100
गणित विषय
तनाज मोमीन ः 100 ः पैकी 100
इंग्रजी विषय
सानिका देशमुख ः 100 पैकी 100