प्रतिनिधी/ बेळगाव
काळी आमराई येथील मातंग गृहनिर्माण सहकार संघ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळाच्यावतीने परिसरातील गरजूंना शनिवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोना थोपविण्यासाठीच्या लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या कुटुंबीयांना धान्य, अन्नपदार्थ, साबण व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सतीश देवरपाटील, विजय कोल्हापुरे, दयानंद माने, जी. एस. तिरकण्णावर, मधू बुडे, प्रफुल्ल विटकर, मारुती चौगुले, गणेश रोकडे, रामा घाटगे, आदिल बॉम्बेवाले, नितीन चौगुले, मनोज चौगुले, विनायक कांबळे, बसवराज निंगण्णावर, राहुल चंपण्णावर आदींच्या पुढाकारातून ही मदत करण्यात आली.