पुणे/प्रतिनिधी
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका सुरुच ठेवलीय. सोमय्या दररोज एका नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. दरम्यान, सोमय्या यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवारांपासून सुरुवात करायची की शरद पवारांपासून या संभ्रमात असल्याचा खोचक टिप्पणीही यावेळी केली. पुढील आठवण्यात अजून एका कॅबिनेट मंत्र्याचे घोटाळे कागदपत्रांसह लोकांसमोर आणणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला.
परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांचे निकटवर्ती मानले जाणारे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या संदर्भातील एका याचिकेवर पुढील महिन्यात लोकायुक्तांसमोर आहे. दोन ते तीन आठवड्यात पहिली कारवाई होणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. मग तरीही अनिल परब मंत्रिमंडळा कसे? असा सवाल सोमय्या यांनी यावेळी केलाय. तसेच याआधी सोमय्या यांनी अनिल परब आणि अनिल देशमुख हे लवकरच जेलमध्ये असतील असं विधान केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनीही बॅग भरून तयार रहावे
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी दुपारी अचानक धावती सांगली येथील कवलापुर ते कुपवाड रस्त्यालगत रेवान्ना मळ्याशेजारच्या एका मोठे क्षेत्र असलेल्या जमिनीची पाहणी केली. तसेच माजी मंत्री अनिल देशमुख तुरुंगाच्या वाटेवर आहेत. अनिल परब यांच्याबाबत तुरुंगात जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही बॅग भरून तयार रहावे, असे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार बैठकीत बोलताना म्हणाले. दरम्यान मी पुरावे असल्याशिवाय आरोप करत नाही. माझे आरोप खोटे असतील तर उद्धव ठाकरे यांनी तसा खुलासा करावा, असे आव्हान ही त्यांनी यावेळी बोलताना केले.