ऑनलाईन टीम / तिरुवनंतपुरम :
केरळचे उच्च शिक्षण मंत्री के. टी. जलील यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ते घरातच क्वारंटाइन झाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, कोरोना काळात देश अनलॉक 5 च्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार अनलॉक 5 मध्ये काही अटींसह जवळपास सर्व सेवा आणि सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत जात असल्याचे दिसत आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांनी 67 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या बुधवार पर्यंत 67,57,132 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 57,44,694 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत 9,07,883 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 1,04,555 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.