ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात 104 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. रुग्ण वाढीच्या मानाने रुग्ण कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. कालच्या दिवसात 71 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 98,552 इतकी झाली आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी 11,732 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 36 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हरिद्वारमध्ये 43, नैनिताल 8, उधमसिंह नगर 9, टिहरी आणि पिथोरागडमध्ये प्रत्येकी तीन – तीन, उत्तरकाशी आणि पौडीमध्ये प्रत्येकी एक – एक रुग्ण आढळून आला.
सद्य स्थितीत 894 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण 94, 533 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1704 (1.73 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.92 % इतके आहे.