ऑनलाईन टीम / नागपूर :
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. नागपूरमध्ये तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूण रुग्ण संख्येने 3. 15 लाखांच्या उंबरठा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत नागपुरात जवळपास 7 हजारच्या आसपास नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, 79 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

वाढता करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध कडक करण्यात आल्यानंतरही रुग्णवाढ कायम असल्याने चिंता वाढली आहे. नागुपरात दिवसाला रुग्णवाढ 5 ते 6 हजारांच्या पार जात असल्याने रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
आज दिवसभरात 6 हजार 956 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 3 लाख 15 हजार 999 इतकी झाली आहे. तर, आज दिवसभरात 5 हजार 004 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 43 हजार 603 इतकी झाली आहे.
दरम्यान, सद्य स्थितीत नागपुरमध्ये 66 हजार 208 इतके सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत 6,188 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.