उचगांव / वार्ताहर
गांधीनगर (ता. करवीर) येथील 52 वर्षीय महिलेचा सोमवारी कोरोनाच्या महामारीमुळे मृत्यू झाला. गांधीनगर परिसरातील सहा गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोमवारी चारने वाढली आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे. परिसरामध्ये एकूण पॉझिटिव रुग्णसंख्या 305 वर पोहोचली आहे. गांधीनगर परिसरातील मृतांची संख्या आजअखेर दहा झाली आहे.
गांधीनगरमध्ये एक तर उचगाव येथे सोमवारी दोन रुग्ण वाढले आहेत. गांधीनगरपैकी गडमुडशिंगी हद्दीत एक रुग्ण सापडला आहे. वळीवडे, चिंचवाड व वसगडे येथील रुग्णसंख्या स्थिर आहे. दरम्यान, गडमुडशिंगीमध्ये गावभागात चार दिवसांपूर्वी मिळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे तिथे निर्जंतुकीकरण ग्रामपंचायतीतर्फे अद्यापही सुरू आहे. गडमुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्यासह आशा कर्मचारी घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्वेसह जनजागृती करत आहेत. #
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची सोमवार अखेरची संख्या अशी – गांधीनगर (132), वळिवडे (63), उचगाव (59), गडमुडशिंगी (25), चिंचवाड (16), वसगडे (10). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 305 वर पोहोचली आहे.
Trending
- रस्ते कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करा; मनसेचे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन
- कोल्हापूरच्या फुटबॉलमधून परदेशी खेळाडूंचे पॅकअप !
- Ratnagiri : बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्यादिवशी महामार्गावर अपघात, महिला जखमी
- मुंबई- गोवा महामार्गाची एक लेन डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल- मंत्री रवींद्र चव्हाण
- तू स्माईल अँबेसिडर झालास…पण त्यांचं हसू हिरावून घेतलंय; क्लाईड क्रास्टो यांचा सचिनसाठी संदेश
- शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांना अडवू नये
- 25 हजाराची लाच घेताना पारगांव ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारी मुलास ताब्यात; सहायक अधीक्षकांवरही गुन्हा दाखल
- भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड